Login

Agriculture Courses

महाराष्ट्रात एकूण चार कृषी विद्यापीठे असून या चारही संस्थामध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी दि.10 सप्टेंबर 1984 रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली.कृषी विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेणे,मूल्यमापन करणे,पर्यवेक्षण करणे आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी परिषदेवर सोपविण्यात आली आहे. कृषी परिषदेचे मुख्यालय पुणे येथे आहे.परिषदेचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी शिक्षण,संशोधन,विस्तार शिक्षण असे तीन मुख्य विभाग करण्यात आले आहेत. सर्वसाधरणपणे काही कालावधीनंतर कृषी परिषदेची सभा घेऊन विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेतला जातो.भविष्यकालीन कामासाठी धोरणात्मक तसेच कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातात. शेतीचा विकास आणि शेतक-यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी ही संस्था गेल्या 25 वर्षापासून अखंडपणे कार्यरत आहे.सलगपणे एखादी संस्था जेव्हा पंचवीस वर्षे कार्यरत राहते,तेव्हा निश्चितपणे त्या संस्थेची गरज समाजाला असल्याचे सिद्ध होते.कृषी क्षेत्राच्या माध्यमातून राज्यासह राष्ट्राच्या विकासाला हातभार लावायचा असेल तर अशा संस्था ठोस भुमिका घेऊन भक्कमपणे उभ्या राहिल्या पाहिजेत.नेमके हेच काम कृषी परिषद करित आहे.सातत्याने शेतक-यांच्या हितासाठी विविध योजना हाती घेऊन त्या राबवते आहे. आणखी एक महत्वाची आणि सर्वांनाच अभिमान वाटावी अशी गोष्ट म्हणजे कृषी शिक्षण,संशोधन व विस्ताराच्या माध्यमातून भारतातले असे नेतृत्व करणारी कृषी ही पहिलीच संस्था आहे.